मुंबई: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या पूरस्थितीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. ( has demanded the state government to ) महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून हातातोंडाशी आलेले पीक तर गेलेच आहे, परंतु घरादाराचेही नुकसान झालेले आहे, असे सांगतानाच ही वेळ आणीबाणीची असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 'प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत द्या' अशा वेळेस पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात ती द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी पार कोलमडला असल्याचे सांगत, अशावेळी निव्वळ आश्वासने आणि शब्दांपेक्षा शीघर कृतीची गरज असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- 'ओला दुष्काळ जाहीर करा' प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत जाईल. परंतु, मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. राज्यातील ही स्थिती पाहता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kPnOr8
No comments:
Post a Comment