Breaking

Thursday, September 2, 2021

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई https://ift.tt/3jFXzms

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २३३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. एचडीआयएल समूहाच्या समभागांचा यात समावेश आहे. पीएमसी बँकेत घोटाळा झाल्याच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाच्या एफआयआरच्या आधारे 'ईडी'ने तपास सुरू केला आहे. एचडीआयएलने पीएमसी बँकेच्या ४,३५५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे 'ईडी'ने गुरुवारी जप्तीची कारवाई केली. 'ईडी'तील सूत्रांनुसार, हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (एचडीआयएल) ताब्यात ९० हजार २५० चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकामाधीन फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सच्या वितरण व विक्रीचे अधिकार त्यांच्याकडे असून घाटकोपर येथील आर्यमन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे हे फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सच्या विक्रीशी संबंधित २३३ कोटी रुपयांचे समभाग आहेत. तेच जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकरणात सोमरसेट कन्स्ट्रक्शन्स, सर्विअल कन्स्ट्रक्शन्स, सफायर लँड डेव्हलपमेंट, एमराल्ड रिअॅल्टर्स, आवास डेव्हलपर्स, पृथ्वी रिअॅल्टर्स व सत्यम रिअॅल्टर्स यांचे प्रवर्तक व अधिकारीदेखील 'ईडी'च्या लक्ष्यावर असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच त्यांनादेखील समन्स बजावले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kOHqdC

No comments:

Post a Comment