Breaking

Tuesday, September 7, 2021

अर्ध्यावरती डाव मोडला... शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा झाला घटस्फोट, भावुक पोस्ट व्हायरल... https://ift.tt/3jQvNn4

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन ()आणि पत्नी आयेशा मुखर्जी () यांचा घटस्फोट () झाला आहे. आयेशाने ही बातमी सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियामध्ये आता चांगलीच व्हायरल झाली आहे. शिखर आणि आयेशा यांचे जेव्हा लग्न झाले होते तेव्हा त्याच्यावर जोरदार टीका झली होती. कारण आयोशा त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी होती आणि तिचा यापूर्वीही घटस्फोट झाला होता. पण यावेळी धवनच्या आईने त्याला साथ दिली होती. त्यामुळे २०१२ साली शिखर आणि आयेशा यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २०१४ साली शिखर आणि आयेशा यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव जोराव्हर असे ठेवले होते. पण गेल्या वर्षी शिखर आणि आयेशा यांच्यामध्ये काही तरी बिनसल्याचे पाहायला मिळाले. कारण धवनने आयेशाला सोशल मीडियावर फॉलो करणे सोडून दिले होते. त्यानंतर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. पण आज अखेर शिखर आणि आयेशा यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे. आयेशाने जेव्हा शिखबरोबरच्या घटस्फोटाची माहिती दिली तेव्हा तिने एक पोस्टही लिहीली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, " यापूर्वी माझा एकदा घटस्फोट झाला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा विवाह करताना मी सर्वस्व पणाला लावले होते. मला काही तरी सिद्ध करायचे होते. त्यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा माझे लग्न मोडले तेव्हा माझ्यासाठी हा भयावर अनुभव होता. मला वाटत होतं की, घटस्फोट हा एक वाईट शब्द आहे, पण माझा आता दुसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे. पहिल्यांदा जेव्हा माझा घटस्फोट झाला होता तेव्हा वाटले होते की, मी स्वार्थी व्यक्ती आहे. कारण मी माझ्या आई-वडिलांना निराश केले होते, त्याचबरोबर मुलांनाही योग्य ती गोष्ट देऊ शकत नाही. त्याचबरोबर मी देवाचाही अपमान केला आहे. पण आता माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे."


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tmgeXu

No comments:

Post a Comment