मुंबई: (Kishori Pednekar) यांनी करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबत (Third wave of Corona) मोठे वक्तव्य केले आहे. करोना संसर्गाची तिसरी लाट येणार असे नसून ती लाट आलेली आहे, असे म्हणत त्यांनी मुंबईकरांना मास्कचा वापर करत, गर्दी टाळत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (third wave of corona is not coming but it is here says mayor of mumbai ) गणेशोत्सवाबाबत बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की 'माझे घर माझा बाप्पा' हे धोरण स्वीकारून मी माझ्या बाप्पाला सोडून कुठेही जाणार नाही असे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. करोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही आहे, तर ती आलेली आहे. तिसऱ्या लाटेबाबतची घोषणा नागपुरात करण्यात आलेली आहे. हे लक्षात घेता प्रत्येकाने आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात येत्या १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र लोकांना गणेशोत्सवासाठी घराबाहेर न पडता घरीच राहणे आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या. मी माझ्या घरातील बाप्पाला सोडून घराबाहेर जाणार नाही, असा संकल्प करतानाच सार्वजनिक मंडळांनी देखील माझे मंडळ माझा बाप्पा हे धोरण स्वीकारायला हवे. तसेच मंडळाच्या लोकांनी बाप्पाजवळ १०-१० लोकांच्या पाळ्या लावाव्यात आणि करोनाचे नियम पाळावेत. मास्कचा वापर न करता मंडपात बसणे टाळले पाहिजे. तसेच इतरस्त्र फिरता कामा नये असेही महापौर म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- मी स्वत: देखील माझे घर सोडून कुठेही जाणार नाही. याचे कारण म्हणजे राज्यात तिसरी लाट आलेली आहे, असे सांगतानाच नागपुरात तर ही घोषणा करण्यात आलेलीच आहे, याकडेही महापौर यांनी लक्ष वेधले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zRJ6cx
No comments:
Post a Comment