कानपूरः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला ५ महिन्यांचा अवधी आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापत चाललं आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी कानपूरमध्ये जाहीरसभा घेतली. यावेळी ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. वादग्रस्त वक्तव्यामुळे ओवैसी आता वादात आहेत. हैदराबादमधील प्रसिद्ध चारमीनार ही ऐतिहासिक इमारत आपल्या अब्बांची आहे. तसंच देशातील मुस्लिमांची स्थिती लग्नातील बँडवाल्यासारखी आहे. त्यांना लग्नाच्या बाहेर उभं केलं जातं, असं ओवैसी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल हैदराबादच्या जनतेचा आभारी आहे. आम्ही निवडणुकीत भाजपला पुन्हा पराभूत केलं. पंतप्रधान मोदींनी स्वतः येऊन आपल्याविरोधात प्राचर केला होता. तुमचे मुख्यमंत्री बाबा (योगी आदित्यनाथ ) निवडणूक प्रचाराला आले होते. राहुल गांधीही आले होते. चारमीनार येथे त्यांनी जलसा केला होता. चारमीनार ही आमच्या अब्बांची इमारत आहे, या अब्बांसमोर, असं तेव्हा म्हटल्याचं ओवैसींनी बोलले. '१९ टक्के मुस्लिम संख्येवर एकही नेता नाही' लग्नातील बँड वाडवणाऱ्या बँड पार्टीसारखी मुस्लिमांची देशात अवस्था आहे. त्यांना आधी बँड वाजवण्यास सांगण्यात येतं, पण नवरदेव मंडपात आल्यावर बँडवाल्यांना बाहेरच थांबवण्यात येतं. आता मुस्लिम बँडवाल्यांसारखे होणार नाही. ते सरकारचा बँड वाजवतील. प्रत्ये जातीचा एक नेता आहे, पण मुस्लिमांचा एकही नेता नाही. उत्तर प्रदेशात मुस्लिांची संख्या १९ टक्के आहे. पण एकही प्रमुख नेता नाही. मरण्यापूर्वी यूपीत किमान १०० मुस्लिम नेते असावेत ही आपली इच्छा आहे, असं ओवैसी म्हणाले. 'नेता नसल्याने मुस्लिमांना सन्मान नाही' उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत फक्त मतदार राहणार की नेतेही होणार? हे मुस्लिमांना ठरवावं लागणार आहे. आपल्याला बँडबाजावाले व्हायचं नाहीए. मुस्लिमांनी एकजुटीने मतदान करावं. मुस्लिम जागे झाले नाहीत, तर नुकसान होईल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. पोलिसांनी मौलाना कलमी सिद्दीकीना तुरुंगात टाकलं. पण काँग्रेस, बसपा आणि समाजवादी काहीच बोलले नाहीत. कारण आपली मतं जातील याची त्यांना भीती आहे, अशी टीका ओवैसींनी केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ibS25T
No comments:
Post a Comment