Breaking

Thursday, September 30, 2021

परमबीर सिंग यांचे पलायन?; अटकेच्या भीतीने देश सोडून गेल्याचा संशय https://ift.tt/3urHeFD

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः 'मुंबईचे हे अटकेच्या भीतीने देश सोडून पळून गेल्याचा संशय पोलिस, 'एनआयए' आणि महाराष्ट्र सरकारला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयासोबत प्रयत्न करून परमबीर सिंग यांना आम्ही शोधत आहोत,' असे यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. सरकारी अधिकारी असल्यामुळे परदेशात जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे त्यांना बंधनकारक आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 'ते गेले असले, तरी ती चांगली गोष्ट नाही. कोणीही मंत्री असो, कुणीही अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेतल्याशिवाय बाहेरच्या देशात जाण्यास परवानगी नाही. याबाबत केंद्रीय सरकार काय निर्णय करेल हे पाहावे लागेल. महाराष्ट्र सरकार सध्या त्यांना शोधत आहे. कारवाई ही वेगवेगळ्या कारणास्तव होतच राहणार आहे. डिसेंबरमध्ये परमबीर यांच्यावर कारवाईबाबत निर्णय होईल. ते उपस्थित न राहिल्यास याबाबत कारवाई होऊ शकते. त्यांचे चौकशीला उपस्थित राहणे हे महत्त्वाचे आहे,' असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. वाचाः 'त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा हिशेब त्यांच्याकडून घ्यायचा आहे. ही नैमित्तिक प्रक्रिया असून, आम्ही जाणून बुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाही. नियमाला धरून असेल तेच होईल. त्यांच्या कारवाईबाबत मी या घडीला काही सांगू शकत नाही. त्यांना राज्य सरकारने अनेक वेळा कळवले आहे. कोणताही कर्मचारी आजारपणाच्या रजेवर जातो, त्यावेळी त्याचे निवासस्थान आणि ठिकाण हे राज्य सरकारला कळवणे गरजेचे आहे. या प्रकरणात त्यांनी असे काही केले नाही. आम्ही आता त्या दृष्टिकोनातून पावले टाकत आहेत. ते बाहेर गेले असल्याची कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. तथापि, आमचे अधिकारी केंद्र सरकारबरोबर समन्वय करीत आहेत,' असेही वळसे पाटील यांनी सांगितले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी चांदीवाल आयोग करीत आहे. या आयोगाने चार वेळा परमबीर सिंग यांना समन्स पाठवले असून, अटक वॉरंटही काढलेले आहे. चंदीगड, रोहतक आणि मुंबईतील घरी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केला. सध्या त्यांचा मोबाइल बंद आहे. एनआयएने दाखल केलेल्या अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांच्यावर आरोप नाही. मात्र, विविध पाच गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पोलिस त्यांना कधीही अटक करण्याची शक्यता आहे. त्या भीतीने परमबीर सिंग हे युरोपातील देशात लपले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा तपास यंत्रणांना अजून मिळालेला नाही. वाचाः पाच गुन्हे दाखल परमबीर सिंग हे अटकेच्या भीतीने देश सोडून पळून गेल्याचा संशय एनआयए, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए तपास करीत असून, परमबीर सिंग यांच्यावर राज्यात विविध पोलिस ठाण्यांत अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. निलंबित पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंग हे एकदा एनआयए कार्यालयात आले होते. दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाने परमबीर यांना अनेकदा समन्स पाठवले आहे. परंतु, ते समन्सही सिंग यांना मिळालेले नाही. चार मेपासून रजेवरच परमबीर सिंग हे सन १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३२ वर्षे त्यांनी महाराष्ट्रात सेवा बजावली आहे. मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून पाय उतार व्हावे लागले होते. परमबीर सिंग यांची बदली होमगार्डमध्ये झाली होती. अँटिलिया स्फोटकेप्रकरणी परमबीर सिंग यांची गेल्या १७ मार्च रोजी बदली झाली होती. होमगार्ड महासंचालक पदाचा त्यांनी २२ मार्चला पदभार स्वीकारला. ४ मेपासून ते रुजू होणार होते. मात्र, त्यांनी वैद्यकीय रजा टाकली. वेळोवेळी त्यांनी रजा वाढवून घेतली. अलीकडेच त्यांनी २९ ऑगस्टपर्यंत रजा वाढवून घेतली होती, असे गृह खात्यातील सूत्रांकडून समजते. 'केंद्राने व्यवस्था केली का?' मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याकडे लक्ष वेधले असता 'परमबीर सिंग यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते, तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत, अशी तपास यंत्रणांना शंका असली, तरी परमबीर सिंग यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकारमार्फतच केली गेली आहे का,' अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YcBhR6

No comments:

Post a Comment