: कार चोरणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल ६५ किलोमीटरचा पाठलाग केला. अखेरीस दोघांना मुंबई हायवेवर ताब्यात घेण्यात आलं. फैसल रफिक सय्यद (२४, रा. रहेमानिया कॉलनी) आणि सय्यद अरबाज सय्यद आरेफ (रा. रोषण गेट) असं पकडलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी गुलाब विश्व हॉलजवळ असलेल्या वैष्णवी जुने कार विक्री करणाऱ्या दुकानात दोन जण आले. आरोपींनी कार विकत घेण्याच्या नावाखाली कारची ट्रायल घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर रस्त्यात कारमध्ये बसलेल्या कामगाराला चाकूचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवलं आणि कार घेऊन पळ काढला. हे दोघेही कार घेऊन सुसाट वेगाने जात होते. चोरीला गेलेल्या गाडीचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक दत्ता शेळके, गोकुळ ठाकुर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, पोलीस अंमलदार किरण गावंडे, संजयसिंग राजपूत, धर्मराज गायकवाड हे खासगी गाडी घेऊन निघाले. पोलिसांनी सदर गाडीची माहिती कंमाड अॅण्ड कंट्रोल रूमच्या सीसीटीव्हीतून घेतली. हे चोर मुंबई हायवेकडे जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दत्ता शेळके व त्यांच्यासोबत अन्य पोलिसांनी ६५ किलोमीटर पाठलाग करून मुंबई हायवेवर या गाडीला अडवलं. त्यानंतर आरोपींनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. या गाडीतून दोन्ही चोर पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. दोन्ही आरोपी सध्या जिन्सी पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BCXKFf
No comments:
Post a Comment