म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अंतर्गत वर्ष २०२४पर्यंत राज्यातील ग्रामीण भागांत १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल. २०२४पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याचे नळजोडण्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा. मुख्य सचिव यांनीही याबाबत आढावा घ्यावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी पोहचविण्यासाठी या वर्षासाठी ७ हजार ६४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तेवढाच निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. अशाप्रकारे १४ हजार १२८ कोटी रुपये उपलब्ध होतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zCzRNk
No comments:
Post a Comment