Breaking

Monday, October 11, 2021

पुरुषांच्या तुलनेत महिलांना संधीवाताची अधिक चिंता; ही आहेत कारणे https://ift.tt/2YH9l84

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः सतत पाण्यामध्ये काम करणे, आहाराच्या चुकीच्या सवयी, जीवनशैलीमध्ये सातत्याने झालेला बदल अशा विविध कारणांमुळे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत संधीवाताचा त्रास अधिक असल्याचे दिसून आले आहे. संधिवाताचा त्रास हा वाढत्या वयोमानामुळे होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र, सध्या महिला आणि तरुणांमध्येही हा आजार प्रकर्षाने दिसू लागला आहे. योग्यवेळी संधिवाताच्या त्रासाकडे लक्ष द्यायला हवे, याकडे डॉक्टरांनी सांगितले आहे. लठ्ठपणा, धुम्रपान तसेच ताणतणावांमुळे हा त्रास वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. सांध्याला सूज येणे, वेदना तसेच लालसरपणा येत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत. स्नायू दुर्बल होऊन सांध्याचा आकार बदलू लागतो. वाताचा त्रास जसा वाढत जातो, तसा मनगट, गुडघे, ढोपर, खांदे आणि मानेवर लक्षणे दिसू लागतात. 'पुरुषांच्या तुलनेत महिलांना 'रूमेटाइड' या प्रकारातील संधीवाताचा त्रास अधिक पाहायला मिळतो. सध्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या दहापैकी सहा रुग्णांना संधिवाताचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. हे रुग्ण ४० ते ५० वयोगटातील असतात. मैदानी खेळ खेळताना दुखापत झाल्यास योग्यवेळी लक्ष दिले नाही, तरी हा त्रास उद्धभवतो', असे अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. श्याम ठक्कर यांनी सांगितले. तरुणांमध्ये धूम्रपान तसेच इतर प्रकारच्या व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्यास त्यांनाही 'रूमेटाइड' प्रकारच्या संधीवाताचा त्रास अधिक होतो. दगदग, व्यायामाचा अभाव, गुडघ्याला दुखापत होणे यामुळेही या त्रासात भर पडते, असे याकडे अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. वैशाली पाटील यांनी लक्ष वेधले. पौष्टिक आहार हवा हा त्रास असणारे २० ते ३० वयोगटातील दररोज १० ते १५ तरुण व्यक्ती उपचारासाठी येत आहेत. लॉकडाउनच्या काळामध्ये पुरेशी झोप न घेणे, जंक फूडचे अतिरिक्त सेवन या कारणांमुळे तरुणांमध्येही हा त्रास वाढता असल्याचे आहारतज्ज्ञ पल्लवी पाटील यांनी सांगितले. सातत्याने वाढता तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AsnR0F

No comments:

Post a Comment