म. टा. विशेष प्रतिनिधी, गर्दीच्या ठिकाणी काम करत असलेले नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या () लसीकरणावर मुंबई महापालिका भर देणार आहे. या गटाचे लसीकरण वेगाने करण्यासाठी रविवारपासून विशेष मोहीम सुरू केली असून दररोज ५०० लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भाजीविक्रेते, फेरीवाले, दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, कर्मचारी, डिलिव्हरी बॉय, टॅक्सी, ट्रक चालक हे घटक सतत गर्दीत असतात. त्यांच्याकडून संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या सुपर स्प्रेडर नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जिविका हेल्थकेअर व पालिका मिळून ही लसीकरण मोहिम राबवत आहे. दररोज ३०० ते ५०० जणांचे लसीकरण केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3v1Mwbh
No comments:
Post a Comment