Breaking

Monday, October 4, 2021

रिकी पॉन्टिंगने भर मैदानात घातला राडा, पंचांकडे धावून जात म्हणाला हे असं करणं बरं नव्हं... https://ift.tt/2YnCPId

दुबई : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना चांगलाच रंगलेला होता. अखेरचे षटक सुरु होते आणि दिल्लीला जिंकण्यासाठी पाच चेंडूंत चार धावांची गरज होती. त्यानंतरचा चेंडू जेव्हा चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होने टाकला तेव्हा दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. पॉन्टिंगने यावेळी मैगानात राडाच घातला. मैदानातील पंचांकडे तो धावून गेला आणि त्याने आपली नाराजी व्यक्त करत एक मोठी गोष्ट सांगितली. नेमकं घडलं तरी काय, पाहा...अखेरच्या षटकात दिल्लीला जिंकण्याासाठी सहा चेंडूंत सहा धावा हव्या होत्या. पहिल्याच चेंडूवर दिल्लीने दोन धावा मिळवल्या आणि त्यांना पाच चेंडूंत चार धावा हव्या होत्या. त्यावेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्टम्पजवळ येऊन यष्टीरक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या फलंदाजाचा मोठा फटका रोखण्यासाठी धोनीने ही चाल खेळली होती. पण या षटकातील दुसरा चेंडू ब्राव्होने स्टम्पच्या बाहेरच टाकला. धोनीलाही हा चेंडू पकडता आला नाही आणि त्यावेळी पंचांनी हा वाईड बॉल असल्याचे घोषित केले. त्याचबरोबर शिमरॉन हेटमायर आणि अक्षर पटेल यांनी एक धाव धावून घेतली आणि दिल्लीला दोन गुण मिळाले. पण त्यानंतर पॉन्टिंगचा पारा चांगलाच चढल्याचे पाहायला मिळाले. कारण पॉन्टिंग आप्लया जागेवरून उठला आणि त्याने थेट पंचांना गाठले. हा चेंडू वाइड नसून नो बॉल द्यायला हवा, असा युक्तीवाद पॉन्टिंग पंचांकडे करत होता. चेंडू वाईड असला किंवा नो बॉल असला तरी दिल्लीला धावा सारख्याच मिळणार होत्या, पण त्यामधली तांत्रिक गोष्ट पॉन्टिंगने हेरली होती. जर पंचांनी नो बॉल दिला असता तर त्यापुढच्या चेंडूवर दिल्लीच्या संघाला फ्री-हिट मिळाला असता. त्यामुळे या चेंडूवर जर दिल्लीच्या फलंदाजाने मोठा फटका मारला असता तर त्याला बाद ठरवता आले नसते, या अपवाद फक्त रनआऊटचा होता. त्यामुळे जर नो बॉल पंचांनी दिला असता तर त्यानंतरच्या चेंडूवर दिल्लीच्या फलंदाजाने बिनधास्त फटका मारला असता. पण यावेळी पंचांनी आपला निर्णय बदलला नसल्याचे पाहायला मिळाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WFWeDr

No comments:

Post a Comment