Breaking

Monday, October 4, 2021

डार्कनेटचा वापर; ड्रग्जसाठी बिटकॉइन!; आर्यनबाबत वानखेडे म्हणाले... https://ift.tt/3muxGGu

मुंबई: क्रूझवरील प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा व अन्य आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असतानाच या प्रकरणाला आता गंभीर वळण लागताना दिसत आहे. एनसीबीने एका ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांनी माहिती दिली आहे. ( ) वाचा: आर्यन खान याच्या अटकेनंतर प्रथमदर्शनी जे पुरावे आढळले होते ते पाहता एनसीबी कोठडी वाढवून मागणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी एनसीबीने आर्यन व अन्य आरोपींची कोठडी वाढवून मागितली आणि ती विनंती कोर्टाने मान्यही केली. या सर्वांना आता ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. याबाबत समीर वानखेडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडे यांनी दिलेली माहिती आर्यन खान व अन्य आरोपींच्या अडचणींत भर टाकणारी आहे. वाचा: 'क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचं हे प्रकरण अतिशय गंभीर असून अजून बराच तपास करावा लागणार असल्यानेच आम्ही आर्यन खान व अन्य आरोपींची कोठडी वाढवून मागितली. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्यात आली असून त्यात एक ड्रग्ज तस्करही जाळ्यात आला आहे. त्याच्या तपासात ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी डार्कनेटचा वापर करण्यात आला व ड्रग्जच्या बदल्यात दिले गेले असल्याचे आढळून आले आहे. या ड्रग्ज पुरवठादाराकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठाही जप्त करण्यात आला असून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने याबाबत अधिक खोलात जाऊन आम्हाला तपास करावा लागणार आहे', असे वानखेडे यांनी नमूद केले. ड्रग्ज पार्टी प्रकरणात जी नवी माहिती समोर येत आहे त्यात आर्यन खानची थेट लिंक आहे का, अशी विचारणा केली असता, असा कोणताही दावा मी आता करणार नाही. आम्ही जी माहिती हाती येत आहे त्याचा सर्व बाजूंनी प्रथम तपास करणार आहोत. एकदा आमचा तपास पूर्ण झाला की मगच आम्ही त्यावर बोलू, असेही वानखेडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉर्डेलिया क्रूझवर शनिवारी छापा टाकण्यात आला होता. मुंबईहून गोव्याला निघालेल्या या क्रूझवरील ड्रग्ज पार्टी एनसीबीने उधळली होती. ही कारवाई सुरू असतानाही क्रूझ पुढे नेण्यात आले होते. त्यामुळेच क्रूझ व्यवस्थापनही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BaAgqV

No comments:

Post a Comment