Breaking

Wednesday, October 6, 2021

किंकाळ्या, पळापळ, गोंधळ... लखीमपूर हिंसाचाराचा नवा थरारक व्हिडिओ व्हायरल https://ift.tt/2YnYRuB

नवी दिल्लीः लखीमपूर खिरीतील हिंसाचाराच्या घटनेचा आणखी एक व्हिडिओ ( ) समोर आला आहे. ४० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक थार वाहन भारधाव येत आंदोलक शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसते आहे. अतिशय थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे. यापूर्वी व्हायरल झालेले व्हिडिओ हे अस्पष्ट आणि दूरून शूट केलेले होते. पण हा व्हिडिओ जवळून शूट केलेला आहे आणि अतिशय स्पष्ट आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू असून त्यांच्या पाठीमागून थार ही गाडी वेगाने येते त्यांना चिरडून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. थार मागे आणखी दोन कारही जाताना दिसत आहेत. लखीमपूर घटनेचा यापूर्वी एक छोटा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जी थार गाडी आहे, तिचा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये थारचा चालक हा शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाताना दिसतोय. पण आता या नव्या व्हिडिओमुळे घटनेबाबत अधिक स्पष्टता आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा देखील या वाहनात होता, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. तर व्हिडिओत दिसणारी थार गाडी ही आपलीच आहे. पण आपण घटनास्थळी नव्हतो, असा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मित्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने केला आहे. पोलिसांनी आशिष मिश्रासह एकूण १५ जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. दरम्यान, अजय मिश्रा यांनी बुधवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर अजय मिश्रा यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकोनियामध्ये शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्यानंतर रविवारी हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला. यात ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lif6ln

No comments:

Post a Comment