: आयुक्तालयाकडून घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या वेळी तीन डमी उमेदवारांना पोलिसांनी पकडल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेन्ट अॅण्ड कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या केंद्रावर पकडण्यात आलेला डमी उमेदवार विठ्ठल जारवाल हा पाच लाख रुपये घेण्याचे ठरवून देण्यासाठी आला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. महेश सुधाकर दांडगे (रा. एटभराज खुर्द, जाफराबाद, जि. जालना) या उमेदवाराच्या जागेवर विठ्ठल किसन जारवाल (रा. पिंपळगाव, औरंगाबाद) याला सिंहगड रोड पोलिसांनी पकडलं होतं. जारवाल हा डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्यासाठी आला होता. परंतू परिक्षेच्या पूर्वी कागदपत्राची व फोटोची पडताळणी केली असता, त्याचं बिंग फुटलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. महेश दांडगे, विठ्ठल जारवाल व जनक सिसोदे हे तिघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्यातूनच त्यांनी लेखी परीक्षा पास करून देण्यासाठी आर्थिक व्यवहार ठरवला होता. जनक सिसोदे याने यासाठी मध्यस्थी केली होती. त्याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स येथे योगेश कौतिकराव गवळी या तरुणाच्या जागेवर बाळासाहेब भीमराव गवळी (रा. धावडा, भोकरदन, जि. जालना) हा परीक्षा देताना आढळून आला. तसंच, या तरुणाला परीक्षा देण्यासाठी मदत करणारा सूरज भोपळावत (रा. सांजखेडा, औरंगाबाद) यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. भिमराव गवळी याचे बीएस्सी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिघे आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. त्यातूनच भिमराव हा कौतिकराव याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी तयार झाला होता. तर भोपळावत हा त्यांना मदतीसाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट आहे का, याची पोलीस तपासणी करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WMjPSP
No comments:
Post a Comment