Breaking

Monday, October 25, 2021

क्रांती रेडकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या... https://ift.tt/2ZmCIfX

अहमदनगर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत. तसंच या प्रकरणावरून समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री यांनाही लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या (BJP ) यांनी आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. या लोकांना मर्दुमकी दाखवायची असेल तर गाव-खेड्यात जावं आणि तेथे अडचणीत सापडलेल्या महिलांना मदत करावी,' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महिला सुरक्षेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका पारनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून करण्यात आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोमवारी या गावात येऊन कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय जनता पार्टीतर्फे मृत तरुणीच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. यानंतर चित्रा वाघ यांनी नगर शहरात येऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, सुजित झावरे उपस्थित होते. चित्रा वाघ यांनी शहरात पत्रकार परिषदही घेतली. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. गरिबांच्या पोरींचा जीव जात असताना सरकार मात्र एका अभिनेत्याच्या मुलाला वाचवण्यासाठी खडबडून जागं झालं आहे, असा आरोप त्यांनी केला. महिलांना सुरक्षा देण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरलं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा होते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आम्ही या घटनांवर आवाज उठवला तर आमच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप होतो. पण तरीही महिलांच्या हितासाठी हे आरोप सहन करून आम्ही आवाज उठवतच राहणार, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरील कथित अन्यायाचा विषयही चित्रा वाघ यांनी सोमवारी पुन्हा उपस्थित केला. तसंच या प्रकरणावरून पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nsOu0T

No comments:

Post a Comment