Breaking

Monday, October 25, 2021

फरार किरण गोसावीची कोंडी; लखनऊ पोलिसांचा नकार, तर पुणे पोलिसांचं पथक रवाना https://ift.tt/3npHVMt

लखनऊः मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणातील पंच आणि साक्षीदार याची अटक अटळ आहे. किरण गोसावी ( ) हा महाराष्ट्राबाहेर आहे. तो उत्तर प्रदेशात असल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय. आता किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आपल्याला सरेंडर करायचं आहे, असं किरण गोसावी लखनऊ पोलिसांना या व्हायरल ऑडिओ क्लिकपमध्ये म्हणतोय. तर पोलिस अधिकारी त्याला सरेंडर करून घेण्यास स्पष्टपणे नकार देत असल्याचं ऐकायला येतंय. मी किरण गोसावी बोलतोय आणि आपल्याला पोलीस ठाण्यात सरेंडर करायचं आहे, असं किरण गोसावी लखनऊतील पोलिस अधिकाऱ्याला म्हणतो. इथे का सरेंडर करायचं आहे? असा प्रश्न संबंधित पोलिस अधिकारी त्याला विचारतात. आपल्याला येथील पोलीस स्टेशन जवळ आहे, यामुळे सरेंडर करायचं आहे, असं गोसावी त्या अधिकाऱ्याला म्हणतो. तर इथे सरेंडर करून घेणार नाही, दुसरीकडे जा, असं सांगत पोलीस अधिकारी किरण गोसावीला नकार देताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतंय. दरम्यान, किरण गोसावी हा लखनऊमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचा एक पथक लखनऊला रवाना झालं आहे. किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. या प्रकरणी आर्यन खान हा तुरुंगात आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी किरण गोसावीने शाहरुक खानची मॅनेजर पूजाशी कोट्यवधींची डील केल्याचा आरोप या प्रकरणाती साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. किरण गोसावीची २५ कोटींची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असाही आरोप प्रभाकर साईलने केलाय. यामुळे आरोपांनंतर किरण गोसावी महाराष्ट्राबाहेर आहे. आर्यन खानसोबतचे किरण गोसावीचा फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, आर्यनच्या सांगण्यावरूनच आपण शाहरुखच्या मॅनेजरला फोन लावला होता, असं किरण गोसावीचं म्हणणं आहे. पुणे पोलिसांना का हवा आहे किरण गोसावी? फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. मलेशियात नोकरी लावतो म्हणून पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी २०१८ मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3b6t7gd

No comments:

Post a Comment