ठाणे: ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिव्यात राबविण्यात आलेल्या लस महोत्सवामध्ये आज एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल १० हजार १० करोना प्रतिबंधक पूर्ण करण्यात आले. देशात कदाचित पहिल्यांदाच अशाप्रमाणे एकाच वेळी एकाच केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी लसीकरणाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे अभिनंदन केले आहे. (10010 crore preventive at a single center in thane on the same day) नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने हा लस महोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- आज सकाळी ९ वाजता दिव्यातील एसएमजी शाळेचे आवारात खासदार लस महोत्सवाला सुरुवात झाली. दोन सत्रात करण्यात आलेल्या या लस महोत्सवामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत एकूण १० हजार १० लसीकरण पूर्ण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्लिक करा आणि वाचा- ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक नगरसेवक, नगरसेविका यांच्या सहकार्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पेशंट निरीक्षक यांच्या शिस्तबद्ध नियोजनात आजचे लसीकरण पार पडले. आज एकाच वेळी १० हजार नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त दिवावासीयांनी समाधान व्यक्त केले. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3B4cEUV
No comments:
Post a Comment