मुंबई: क्रूझवरील प्रकरणी अभिनेता याचा मुलगा याला शुक्रवारी जामीन दिलासा मिळू शकला नाही. त्याचा अंतरिम जामीन अर्ज अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला. आता विशेष एनडीपीएस न्यायालयात त्याला जामिनासाठी अर्ज करावा लागणार असून तो अर्ज सोमवारी दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्यन व अन्य आरोपींना आणखी किमान तीन दिवस न्यायालयीन कोठडीतच काढावे लागणार आहेत. ( ) वाचा: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो टीमने कॉर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी छापा टाकत ड्रग्ज पार्टी उधळली होती. या कारवाईत आर्यन खान, आणि या तिघांसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते व दुसऱ्या दिवशी सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या सर्वांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे अटकसत्र सुरूच असून आतापर्यंत एका नायजेरियन नागरिकासह एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील आर्यनसह क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेले आठही जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर अन्य आरोपी एनसीबी कोठडीत आहेत. आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली असून या तिघांनीही स्वतंत्रपणे अंतरिम जामिनासाठी अर्ज केले होते. या अर्जांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या या न्यायालयात अर्ज सुनावणीयोग्य नाहीत, असा निष्कर्ष नोंदवत अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांनी अर्ज फेटाळले. त्यामुळे आता या तिघांसह अन्य पाच आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने आता सोमवारीच हे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. हे अर्ज दाखल केले गेल्यास त्याच दिवशी सुनावणी होणार की तारीख मिळणार हे सुद्धा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आर्यन व इतर आरोपींना पुढचे काही दिवस कारागृहातच काढावे लागणार आहेत. वाचा: दरम्यान, आर्यन खान व अन्य सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. एनसीबी कोठडीतून शुक्रवारी या सर्वांना कारागृहात नेण्यात आले. पुरुष आरोपींना आर्थर रोड कारागृहात तर महिला आरोपींना भायखळा कारागृहात ठेवण्यात आले आहे. आर्यनसह सर्वांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून सध्याच्या नियमांनुसार सर्वांना ५ दिवस क्वारंटाइन ठेवले जाणार आहे. आर्यनला आर्थर रोड कारागृहाच्या बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mAahU2
No comments:
Post a Comment