Breaking

Monday, October 4, 2021

कोल्हापूरलाही पावसाने झोडपले, सखल भागांत साचले पाणी https://ift.tt/3BcBXo3

म. टा. प्रतिनिधी, दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह तासभर पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. (heavy rainfall with lighting in kolhapur rain in low lying areas) गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात अधून मधून पाऊस पडत आहे. दोन दिवस पावसाची सतत रिपरिप सुरू होती. रविवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. सोमवारी दिवसभर कडक ऊन होते. ऑक्टोबर हिटचा चटका बसत होता. सायंकाळी पाच नंतर अचानक ढग दाटून आले. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तासभर पावसाने झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यासह पडलेल्या पावसाने सखल भागात पाणीच पाणी साचले. दिवसभरात उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळच्या पावसाने दिलासा दिला. पावसामुळे वातारवणात गारवा निर्माण झाला. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. धरण क्षेत्रात मोठा पाऊस पडत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत अजूनही वाढ कायम आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Ac4ngm

No comments:

Post a Comment