शारजा : राजस्थानविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सला जिंकायचा असेल, तर त्यांना आता वेगळी रणनिती आखवी लागणार आहे. त्यासाठी आता मुंबई इंडियन्स सर्वांनाच एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आता एका मॅचविनर खेळाडूला मुंबई इंडियन्सचा संघ संधी देऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. मुंबई इंडियन्स कोणत्या मॅचविनर खेळाडूला संधी देऊ शकते, पाहा...मुंबई इंडियन्सच्या संघाला सध्याच्या घडीला अशा एका खेळाडूची गरज आहे जो दमदार अष्टपैलू कामगिरी करू शकतो. खासकरून फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून संघाची धावसंख्या वाढवून शकतो. त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आता सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत असू शकते. कारण डावखुरी फलंदाजी, फिरकी गोलंदाजी आणि भन्नाट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला आता राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. हा युवा मॅचविनर खेळाडू ठरू शकतो अनुकूल रॉय. आतापर्यंत बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना तुम्ही अनुकूलला पाहिले असेल. अनुकूलने घेतलेला भन्नाट कॅच अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्याचबरोबर अनुकूलने स्थानिक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का देण्यासाठी मुंबईचा संघ अनुकूलला या महत्वाच्या सामन्यात संधी देऊ शकतो. आतापर्यंतच्या पाचही सामन्यांमध्ये कृणाल पंड्या अपयशी ठरला आहे. अनुकूल हा कृणालप्रमाणेच अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची जागी तो भरून काढू शकतो, असे सध्याच्या घडीला दिसत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आता धाडस करून कृणालच्या जागी अनुकूलला संधी देणार का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल. मुंबई इंडियन्सचा संघ आतापर्यंत आपल्या संघात मोठे बदल करत असल्याचे पाहायला मिळालेले नाही. पण सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सपुढे करो या मरो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थिती मुंबई इंडियन्सच्या संघाने थोडी जोखीम उचलायला हवी, असे चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आपल्या संघात कोणता बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oxlw2b
No comments:
Post a Comment