Breaking

Thursday, October 28, 2021

फेसबुकचं नाव बदललं, आता 'मेटा' नावाने ओळखली जाणार कंपनी, झुकरबर्गची घोषणा https://ift.tt/3bmSfiE

वॉशिंग्टनः सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने गुरुवारी रात्री आपल्या कंपनीच्या नाव्या नावाची ( to ) घोषणा केली. आता फेसबुक (facebook) 'मेटा' ( Meta ) या नावाने ओळखली जाईल. फेसबुकने ट्विट करून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियाचे नवे पर्व मेटावर्स () हा सोशल कनेक्शनचा नवा मार्ग असेल. हा एक सामूहिक प्रोजेक्ट आहे. संपूर्ण जागातील नागरिकांद्वारे तो बनवण्यात येईल. सर्वांसाठी तो खुला असेल, असं फेसबुकने ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपण आता फेसबुक नव्हे तर मेटावर्स आहोत, असं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने कंपनीच्या नव्या नावाची घोषणा करताना म्हटलं आहे. फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरून एकामागून एक अनेक ट्विट केले. इन्स्टाग्राम, मॅसेंजर आणि व्हॉट्सअॅप या आम्ही बनवलेल्या अॅप्सची नावं कायम राहतील. विविध अॅप आणि तांत्रिक बाबींना आता नव्या ब्रँडअंतर्गत आणले जाईल. कंपनी आपली कॉर्पोरेट रचना बदलणार नाही, असं फेसबुकने म्हटलं आहे. नवीन नाव मेटावर्सच्या निर्माणावर आपले लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असं कंपनीचा सीईओ मार्क झुकरबर्गने सांगितलं. 'मेटावर्स' हा शब्द सर्वप्रथम तीन दशकांपूर्वी डायस्टोपियन कांदबरित करण्यात आला होता. आता नवीन शब्द सिलिकॉन व्हॅलित चर्चेचा विषय बनला आहे. या शब्दाचा उपयोग हा डिजिटल जगात व्हर्च्युअर आणि इंटरॅक्टिव्ह स्पेस समजण्यासाठी केला जातो. मेटावर्स म्हणजे एक व्हर्च्युअल जग आहे. या जगात एखादी व्यक्त शारिरीकरित्या उपस्थित नसतानाही ती तिथे उपस्थित राहू शकते. यासाठी व्हर्च्युअल रियालिटीचा उपयोग केला जातो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BmTY1Z

No comments:

Post a Comment