मुंबई: प्रकरणात अभिनेता याचा मुलगा याला अटकेनंतर २६व्या दिवशी जामीन मिळाला. आर्यनच्या जामीन अर्जावर सलग तीन दिवस दुपारनंतरच्या सत्रात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. तिसऱ्या दिवशी एनसीबीने जोरदार युक्तिवाद करत आर्यन हा कसा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक दाखले दिले गेले मात्र, प्रत्युत्तरादाखल आर्यनचे वकील यांनी केलेला युक्तिवादच निर्णायक ठरला. ( ) वाचा: आर्यन खान प्रकरणात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी झाली. एनसीबीतर्फे गुरुवारी अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. साधारण तीन वाजता त्यांचा युक्तिवाद सुरू झाला आणि किमान सव्वातास सिंग यांनी विविध मुद्दे मांडत आर्यन खान तसेच व मूनमून धामेचा या तिघांना जामीन देण्यास तीव्र विरोध केला. आर्यनने क्रूझवर ड्रग्जचे सेवन केले नसले तरी त्याने अमलीपदार्थांचा व्यापार करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे व्यापारी प्रमाणातील अमलीपदार्थाच्या व्यापारात गुंतल्याचा आरोप त्याला लागू होतो आणि त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे कटकारस्थानात तो सहभागी असल्याचे स्पष्ट होते. म्हणून त्याला कलम २९ हे कठोर कलम लागू होते, असा युक्तिवाद सिंग यांनी केला. या प्रकरणातील काही आरोपींकडे व्यापारी प्रमाणातील अमलीपदार्थ आढळले आणि वेगवेगळ्या प्रकारचे अमलीपदार्थ आढळले. म्हणून ते त्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत सेवनासाठी बाळगले, असे म्हणता येणार नाही. क्रूझवर ११ जण भेटणार असल्याचे कळले होते आणि त्यापैकी आठ जणांना एनसीबीने अटक केली. म्हणून आम्ही कटकारस्थान असल्याचे कलम २८ आणि २९ लावले. त्यामुळे जामीन मिळण्याविषयीच्या कठोर अटींचे कलम ३७ लागू होते, असेही सिंग म्हणाले. सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आर्यनतर्फे मुकुल रोहतगी यांनी प्रत्युत्तरादाखल युक्तिवाद केला आणि सिंग यांचे मुद्दे खोडून काढले. मुख्य म्हणजे हा युक्तिवाद सुरू असतानाच न्यायमूर्तींनी आर्यनसह तिघांचेही जामीन अर्ज मान्य केले. वाचा: रोहतगी यांचा हा युक्तिवाद ठरला निर्णायक... - कॉर्डेलिया क्रूझवर जवळपास तेराशे लोक होते, आर्यनचा संबंध केवळ अरबाज मर्चंट आणि अचित कुमार या दोघांशी दाखवण्यात आला आहे. इतर कोणाशीही नाही. एनसीबी म्हणते की, हे कटकारस्थान आहे पण कटकारस्थान होण्यासाठी अनेकांनी मन-बुद्धीने एकत्र येणे आवश्यक असते. तो प्रकारच इथे एनसीबीने दाखवलेला नाही. आर्यनविरुद्ध कटात सहभागी असल्याचा कोणताच पुरावा नाही. - आर्यनला क्रूझवर निमंत्रित करणारे आणखी दोघे होते, गाबा आणि मानव. पण त्यांना एनसीबीने अटक केली नाही. - एनसीबीने ज्या आठ जणांना अटक केली ते सर्व मित्र असते, तरी कटात सहभाग असल्याचा आरोप केला जाऊ शकत होता. पण इथे तसा प्रकारच नाही. कट सिद्ध करणे अवघड असते, कटात सहभागी असलेलेच ते स्पष्ट करू शकतात, असा एनसीबीचा युक्तिवाद आहे पण इथे वस्तुस्थितीच बोलतेय. - आरोपींनी जबाबाविषयी माघार घेतल्याचा मुद्दा हा केवळ खटल्याच्या वेळी विचारार्थ घेतला जाऊ शकतो, असा युक्तिवाद एनसीबीने मांडला. पण तो तसा ग्राह्य धरला तर राज्यघटनेने नागरिकांना अनुच्छेद २१ अन्वये दिलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन ठरेल. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nGfFVV
No comments:
Post a Comment