Breaking

Sunday, October 31, 2021

देशमुखप्रकरणी पहिली अटक! ठाण्यातून संतोष जगतापला सीबीआयकडून अटक https://ift.tt/3bvwGfU

म. टा. प्रतिनिधी, मुंबई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपये खंडणी आरोपप्रकरणी सीबीआयने रविवारी पहिली अटक केली. ठाण्यातून नावाची व्यक्तीस सीबीआयने अटक केली आहे. जगतापला न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करून आणण्याचा आदेश दिला होता, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपान्वये मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले होते. सीबीआयने याप्रकरणी २१ एप्रिलला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासांतर्गत पहिली अटक रविवार, ३१ ऑक्टोबरला करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'संतोष शंकर जगताप ही व्यक्ती या प्रकरणात मध्यस्थ होती, असे सांगितले जात आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी संतोष मध्यस्थीचे काम करत होता, अशी माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यामुळेच सीबीआयच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात त्यांच्या ठाण्यातील घरी छापादेखील टाकला. त्यावेळी नऊ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. त्याखेरीज संतोषला सीबीआयने अनेकदा चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्सदेखील बजावले. पण चौकशीला न आल्याने अखेर रविवार, ३१ ऑक्टोबरला ठाण्यातून अटक करण्यात आली.' पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनेक व्यक्ती 'मध्यस्थ' या नात्याने प्रभाव पाडत असल्याचे राज्याच्या माजी गुप्तचर विभाग प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालात नमूद आहे. सीबीआयकडून या अहवालाचादेखील तपास सुरू आहे. त्या अहवालातील माहितीच्याआधारेच संतोष जगतापला अटक झाल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट मिळाली असल्याचा बनावट अहवाल दोन महिन्यांपूर्वी सामाजिक माध्यमांवर फिरवला गेला होता. त्याबद्दल सीबीआयने त्यांच्याच खात्यातील निरीक्षक अभिषेक तिवारी व अनिल देशमुख यांचे वकील अॅड. आनंद डागा यांनादेखील अटक केली आहे. पण प्रकरणाशी थेट संबंधित पहिली अटक संतोष जगताप यांच्या रूपात रविवारी झाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pUThuM

No comments:

Post a Comment