Breaking

Sunday, October 31, 2021

लोकलगोंधळावर अखेर तोडगा! लसधारकांना मिळणार तिकीट https://ift.tt/3bu6NNy

म. टा. प्रतिनिधी, अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडणारे, दिवाळीनिमित्त प्रवास करू इच्छिणारे मुंबईतील लसधारक नागरिक रेल्वेच्या तिकीट अडवणुकीने बेजार झाले होते. प्रवासाचा पर्याय नसल्याने हतबल झालेल्या या नागरिकांकडून लोकल तिकीट न देण्याच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या गोंधळानंतर राज्य सरकारने लसधारकांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना रेल्वे प्रशासनाला केल्यानंतर मुंबईत तिकीटविक्री सुरू झाली आहे. लसधारक अत्यावश्यक प्रवाशांना मिळावे, त्यांना पासचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आग्रही भूमिका मांडली होती. 'राज्य सरकारने निश्चित केलेल्या लसधारकांच्या व्याख्येनुसार (दुसरी लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण) सर्व लसधारक नागरिकांना सर्व प्रकारच्या प्रवासाचे तिकीट देण्यात यावे, अशा सूचना राज्य सरकारने रेल्वेला दिल्या आहेत. या सूचना मिळताच रेल्वे प्रशसनाने सर्व रेल्वे स्थानकात तिकीटविक्री सुरू केली. प्रवासी जनजागृतीसाठी रेल्वे स्थानके तसेच लोकलमध्ये तिकीट मिळणार असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली. सिंगल, रिटर्न, एक्सटेंशन अशी सर्व प्रकारची तिकिटे राज्य सरकारने मुभा दिलेल्या प्रवाशांना देण्यात येणार आहेत. तूर्त ही सेवा केवळ तिकीट खिडक्यांवर उपलब्ध असेल. प्रवासी गर्दीनुसार एटीव्हीएम, मोबाइल यूटीएस अॅप सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. विनालसधारकांनी रेल्वे प्रवास करू नये, यासाठी रेल्वेने योग्य ती खबरदारी घ्यावी. आवश्यक सर्व यंत्रणा वापराव्यात, अशा खबरदारीच्या सूचना ही राज्य सरकारने रेल्वेला केल्या आहेत. मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर, पश्चिम आणि बेलापूर-खारकोपर मार्ग अशा सर्व रेल्वे मार्गिकांवर एका रात्रीत तिकीटविक्री बंद झाली होती. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून थेट उद्घोषणेतून तिकीटबंदीची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली होती. ...... प्रवासासाठी पत्राचा आधार राज्य सरकारने रेल्वेला पाठवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. रविवारी मेगाब्लॉक असल्याने प्रवासी कमी होते. मात्र दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशांनी या पत्राचा आधार घेत रेल्वे स्थानकांवर तिकिटांसाठी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे रविवारी काही रेल्वे स्थानकात तिकीटविक्री सुरू होती तर काही रेल्वे स्थानकातील कर्मचारी रेल्वेच्या अधिकृत लेखी निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून आले. सोमवारपासून तिकीटविक्री सुरळित होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. ......


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/319AC44

No comments:

Post a Comment