मुंबई : वायदेपूर्ती आणि चौफेर विक्रीने शेवटच्या दोन सत्रात आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली आहे. या घसरणीने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. दरम्यान, नवे वर्ष सुरु होण्यापूर्वी आणखी काही सत्रात घसरण कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. अमेरिकन बाजार गुरुवारी तेजीसह बंद झाले होते. अॅपल आणि अॅमेझाॅन या दिग्गज कंपन्यांच्या तिमाही निकालांची उत्सुकता असल्याने बाजारात मोठी खरेदी झाली. त्याचबरोबर युरोपातदेखील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. त्याचे परिणाम सोमवार भारतीय बाजारात दिसून येतील,अशी शक्यता आहे. १७६०० ते १७५०० च्या आसपास राहील, असा अंदाज एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक रोहीत सिंगरे यांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात निर्देशांकात मोठी घसरण झाली. हाच ट्रेंड कायम राहू शकतो. जर त्यातून बाजार सावरला तर निफ्टी १७८०० ते १७९०० च्या दरम्यान वाढेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. मागील आठ सत्रात निफ्टीने जवळपास १००० अंक गमावले आहेत. त्यामुळे तो पुन्हा उभारी घेण्याची शक्यता जास्त आहे, असे मत चार्टव्ह्यू इंडियाचे मझर मोहम्मद यांनी व्यक्त केले. सध्या पीएनबी, आरबीएल बँक, टाटा मोटर्स, एसबीआय कार्ड्स, क्रूर वैश्य बँक, एल अँड टी या शेअरचा एमएसीडी नकारात्मक दाखवत आहे. दरम्यान प्राथमिक बाजारात आयपीओंची गर्दी वाढली आहे. गुंतवणूकदारांनी पैसे आयपीओकडे वळवले असल्याने भांडवली बाजारात आणखी काही दिवस दबाव राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला होता तर निफ्टीत १८५ अंकांची घसरण झाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pTtKCh
No comments:
Post a Comment