Breaking

Tuesday, October 12, 2021

पुण्यातील घटनेवर अजित पवारांचा संताप; ही राक्षसी वृत्ती ठेचलीच पाहिजे! https://ift.tt/3DAZhfT

मुंबई: पुण्याच्या परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करून हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. ( Ajit Pawar On ) वाचा: शाळेत शिकणाऱ्या, होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या. वाचा: पुण्याचे पालकमंत्री तथा तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणारा व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. बिबवेवाडीतील घटनेने पुणे हादरले बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असताना कबड्डीपटू असलेल्या चौदा वर्षाच्या मुलीवर नात्यातील मुलाने कोयत्याने वार करून तिचे शीर धडावेगळे करत खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत १४ वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे. याप्रकरणी ओंकार उर्फ (वय २१, सध्या-रा. चिंचवड) याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली मुलगी कबड्डीपटू असून आठवीत शिक्षण घेत होती. यश लॉन्स परिसरात ती दररोज कबड्डीचा सराव करण्यासाठी येत होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती पाच मैत्रिणींसोबत या ठिकाणी सरावासाठी आली होती. कबड्डी खेळून झाल्यानंतर ती मैत्रिणीसोबत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर तिघेजण त्या ठिकाणी आले. तिघांपैकी नात्यातील असलेला आरोपी भागवत याने तिला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वादावादी सुरू केली. त्याच रागातून आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीवर सपासप वार केले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मित्राने तिच्या मानेवर वार करून तिचे शीर धडावेळगे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी तिच्या सोबत असलेल्या मुलींना धमकाविले. त्यानंतर घटनास्थळी कोयते टाकून आरोपींनी पळ काढला. या घटनेने पुणे हादरले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lvjcXn

No comments:

Post a Comment