Breaking

Tuesday, October 12, 2021

'मोदींच्या बदनामीचा सुनियोजित कट रचला जातोय'; भाजपचा आघाडीवर आरोप https://ift.tt/3BAhQQU

मुंबई: 'महाराष्ट्र बंद'नंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात (Maha vikas Aghadi Govt) भारतीय जनता पक्ष (BJP) आता आक्रमक झाला आहे. () यांच्या विरोधात आणि केंद्र सरकारबाबत बदनामीचा सुनियोजित कट (), () आणि (Congress) हे पक्ष रचत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार () यांनी केला आहे. या कटाचा जनतेसमोर आम्ही भांडाफोड करणार असल्याचेही शेलार म्हणाले. आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही, असेही शेलार यांनी म्हटले आहे. (the bjp has accused the of plotting to discredit prime minister modi) भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शेलार बोलत होते. महाराष्ट्रातील जनतेला जी मदत सेवासुविधा आवश्यक आहेत त्या मिळत नाहीत, हे सरकार विकास करू शकत नाही, असे सांगतानाच या सरकारकडून शेतकऱ्याला, विद्यार्थ्याला, बारा बलुतेदारांना, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना, मराठा समाजाला काहीही मिळत नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही ठरवली आहे. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक आज भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला केंद्रीय प्रभारी सि.टी. रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्ला, सह प्रभारी पवय्या, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा घेण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये जवळजवळ २७४ नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, या निवडणुकांसाठी शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा असेल, असे शेलार यांनी सांगितले. तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणूका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीच्या नंतर एक चिंतन बैठक आमची होईल, असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3v5huiE

No comments:

Post a Comment