Breaking

Wednesday, October 6, 2021

शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; अंबाबाईच्या दर्शनासाठी इथे करा ऑनलाइन बुकिंग https://ift.tt/3DhjdUR

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारी प्रारंभ होत आहे. टाळेबंदीमुळे बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी गुरुवारी पहाटेपासून खुले होणार आहेत. ऑनलाईनवर नोंदणी करणाऱ्यांना देवीचे थेट दर्शन घडणार आहे. तसेच ऑनलाईन बुकींग करणाऱ्यां भाविकांना महाद्वारातून मुख दर्शनाची सोय केली आहे. ( in mahalaxmi mandir in kolhapur is available) गेले पंधरा दिवस नवरात्रोत्सवासाठी मंदिरात तयारी सुरू असून आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर झळाळून निघाले आहे. देवीचे नित्य विधी होणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंदिराला भेट दिली. मंदिरातच्या आवारात आकर्षक फुलाफळांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर अंतर्बाह्य नटले आहे. क्लिक करा आणि वाचा- ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी शिवाजी चौक आणि एमएलजी येथून सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बॅरिकेटस् बांधण्यात आली आहेत. मुखदर्शनाच्या रांगेसाठी बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार या मार्गावर बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत. भाविकांच्या दर्शनाची सोय आणि सुरक्षिततेची जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी पाहणी केली. क्लिक करा आणि वाचा- गुरुवारी सकाळी तोफेच्या सलामीनंतर घटस्थापना होणार आहे. त्यानंतर देवीची नित्य नियमाने पूजा होणार आहे. दुपारी अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे. भाविकांना पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यत पर्यंत ऑनलाईन दर्शन मिळणार असून त्यानंतर भाविकांना दर्शन बंद होणार आहे. ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी चप्पल स्टॅडची सोय करण्यात आली आहे. भाविकांना मास्क बंधनकारक असून दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात साडी, ओटी, नारळ, तेल किंवा पूजेचे साहित्य नेण्यास मनाई राहणार आहे. रात्री नऊच्या सुमारास पालखी सोहळा होणार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mv9SSH

No comments:

Post a Comment