Breaking

Wednesday, October 6, 2021

राहुल आणि प्रियांका गांधी लखीमपूरमध्ये मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटले; बोलले... https://ift.tt/3air1sU

लखीमपूर खिरीः काँग्रेस नेते आणि यांनी लखीमपुरी खिरी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी लव्हप्रीतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे पीडित कुटुंबाशी बोलले आणि त्यांच्याकडे शोक व्यक्त केला. बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. तसंच न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह सुरूच राहणार आणि असल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विट केलंय. 'शहीद लवप्रीतच्या कुटुंबाला भेटून दु: ख सामायिक केले, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह सुरूच राहणार आहे. तुमचा त्याग विसरणार नाही, लवप्रीत.' राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री पालिया तहसील गाठले. रविवारी झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या ४ शेतकऱ्यांपैकी एक मृत लवप्रीत सिंगच्या कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी चौखरा फार्म येथील शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. तिथे ते शोककुल कुटुंबाशी बोलले आणि तीव्र शोक व्यक्त केला, असं काँग्रेस सूत्रांनी सांगितलं. शिष्टमंडळात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुडाही आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DjeuC4

No comments:

Post a Comment