Breaking

Wednesday, October 6, 2021

सत्यशोधक आनंदराव शिंदे यांचे निधन; देहदान व नेत्रदानाची इच्छा राहिली अपुरी https://ift.tt/3iCUd2B

सातारा: वाई तालुक्यातील बोपेगाव येथील सत्यशोधक विचाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅडव्होकेट आनंदराव शिंदे यांचे सातारा येथील खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. ( passed away in satara) क्लिक करा आणि वाचा- त्यांच्यामागे मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. वाई पंचक्रोशीतील कृषी पदवी मिळवणारे १९५० सालचे ते पहिले पदवीधर होत. त्यांनी नोकरी करीत असताना एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले. केंद्र सरकारच्या कस्टम खात्यातून असिस्टंट कलेक्टर म्हणून ते निवृत्त झाले. आयुष्यभर सत्यशोधकीय विचार त्यांनी जोपासले. त्यांच्या मुलाचे व नातवांचे विवाह त्यांनी सत्यशोधकी पद्धतीने लावले. क्लिक करा आणि वाचा- व त्यांची इच्छा राहिली अपुरी देहदान व नेत्रदानाची त्यांची इच्छा मात्र कोरोना च्या संसर्गामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या आठवणी सांगणारे "आनंद यात्री " हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचनीय असे आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AcjQ08

No comments:

Post a Comment