म. टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी सोमवारी दिनांक ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (polling for elections will be held on november 21) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात दि. ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरूवात होणार असून दि. १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दि. २० रोजी छाननी होणार आहे. दि. २१ पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे. त्यानंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार असून दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्हा बँकेत निवडणूक कार्यालय जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृह देखिल सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणूकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mSOO95
No comments:
Post a Comment