अबुधाबी: आयपीएलच्या १४व्या हंगामातील अखेरच्या साखळी लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ४२ धावांनी पराभव केला. पण या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना आनंद होण्या ऐवजी दुख: झाले. कारण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला या सामन्यात आवश्यक त्या रनरेटने विजय मिळवता आला नाही. वाचा- मुंबई इंडियन्सने हैदराबादला २३६ धावांचे मोठे आव्हान दिले होते. हैदराबादचा सलामीवीर जेसन रायने सहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना हैदराबादचा ६४ धावांच्या आत ऑल आउट करावा लागणार होता. पण ही धावसंख्या हैदराबादने विकेट न गमावता पार केली. यामुळे गेल्या सलग दोन हंगामात विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईवर फेरीत गारद होण्याची नामुष्की आली. तसेच त्यांचे विजेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न देखील भंगले. वाचा- हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या बाजूने पहिला कल आला तो म्हणजे रोहित शर्माने टॉस जिंकला. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईला मोठ्या धावसंख्येची गरज होती आणि त्याचा पाया ईशान किशनने रचला. ईशाने फक्त १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो ३२ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. ईशानने ११ चौकार आणि ४ षटकार मारले. मुंबईने १० षटकात १३१ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईच्या डावाचा कळस रचला. त्याने ४० चेंडूत ८४ धावा केल्या. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावांचा डोंगर उभा केला. उत्तरा दाखल हैदराबाद संघाला २० षटकात ८ बाद १९३ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील आजवरची कामगिरी २००८- साखळी फेरी, पाचवे स्थान २००९- साखळी फेरी, सातवे स्थान २०१०- उपविजेते २०११- प्लेऑफ २०१२- प्लेऑफ २०१३- विजेतेपद २०१४-प्लेऑफ २०१५-विजेतेपद २०१६-साखळी फेरी, पाचवे स्थान २०१७-विजेतेपद २०१८-साखळी फेरी, पाचवे स्थान २०१९-विजेतेपद २०२०- विजेतेपद २०२१- साखळी फेरी, पाचवे स्थान
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oOBIvV
No comments:
Post a Comment