Breaking

Wednesday, October 27, 2021

डेल्टा प्लसचे सात रुग्ण, कर्नाटकात परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली https://ift.tt/3mnzFgA

वृत्तसंस्था, बेंगळुरू कर्नाटकमध्ये करोनाच्या प्रकाराचा संसर्ग झालेले आढळले आहेत. या प्रकारच्या संसर्गाचे तीन रुग्ण बेंगळुरूतील असून, इतर चार रुग्ण राज्याच्या अन्य भागांतील आहेत, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आयुक्त डी. रणदीप यांनी दिली. करोनाच्या नवीन प्रकारच्या संसर्गामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र, दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'आंतरराष्ट्रीय विमानप्रवाशांसाठी कर्नाटक सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तास आधी केलेली असावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 'एअर सुविधा' पोर्टलवर प्रवशांना हा अहवाल अपलोड करावा लागेल. विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही,' असेही रणदीप यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. ज्या प्रवाशांना विमानतळावरील तपासणीदरम्यान लक्षणे आढळतील, त्यांना तातडीने विलगीकरणात पाठवले जाणार आहे. संबंधितांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य नियमांप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. करोनाच्या दृष्टीनो धोकादायक देशांची यादीही कर्नाटक सरकारने जारी केली असून, युरोप, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझिलंड आणि झिम्बाब्वे या देशांचा यात समावेश आहे. बंगालमधील बारुईपूरमध्ये निर्बंध कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली असून, बारुईपूर शहरातही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारुईपूरमध्ये प्रशासनाने २४ कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. सोनारपूर-राजपूर महापालिका, बारुईपूर महापालिका, तसेच जॉयनगर ब्लॉकमध्ये आज, गुरुवारपासून तीन दिवस लॉकडाउन लागू केले जाणार आहे. अधिकारी शनिवारी परिस्थितीचा आढावा घेणार असून, त्यानंतर पुढील निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या १२९ कंटेन्मेंट झोन असून, त्यापैकी सर्वाधिक ४३ झोन नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यात आहेत. 'लशीच्या जुमल्याने जीव वाचणार नाहीत' काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवर बुधवारी टीका केली. 'खरे लसीकरणच लोकांचे जीव वाचवू शकते, लसीकरणाची 'जुमला' आवृत्ती नाही,' अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. देशातील मोठ्या संख्येने लोकांचे लसीकरण अद्याप पूर्ण व्हायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा वृत्तपत्रातील लेख राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल सोनिया गांधी यांनी या लेखात शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे कौतुक केले आहे. मात्र, त्याच वेळी देशात अद्यापही मोठ्या संख्यने नागरिक आणि मुलांचे लसीकरण होणे बाकी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Copq1m

No comments:

Post a Comment