दुबई : भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना सर्वात महत्वाचा आहे. कारण हा सामान गमावल्यावर भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडिया आपल्या संघात दोन मोठे बदल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पहिला बदल...पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली होती, पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. जेव्हा वरुणला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. पण भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपली ही चूक सुधारणार असल्याचे दिसत आहे. कारण या सामन्यात भारत आपल्या सर्वात अनुभवी फिरकीपटूला म्हणजेच आर. अश्विनला संधी देण्याच्या तयारीत आहे. जेव्हा संघाला विकेट्सची गरज असते तेव्हा अश्विन संघाच्या मदतीला धावून आला आहे. त्यामुळे या सामन्यात अश्विनला संधी मिळू शकते. दुसरा बदल...भारतीय संघाने फॉर्मात नसतानाही हार्दिक पंड्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी दिली होती. पण ही गोष्ट भारतीय संघाला चांगलीच महागात पडली. कारण हार्दिकला संधी असूनही चांगी फलंदाजी करता आली नाही. त्याचरोबर हार्दिकला या सामन्यात दुखापतही झाली होती. या दुखापतीतून तो सारवलेला आहे, पण तरीही त्याचा फॉर्म चांगला दिसत नाही. त्यामुळे त्याला वगळण्याचा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागेल. हार्दिकच्या जागी भारतीय संघात इशान किशनला संधी मिळू शकते. कारण इशान सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. सराव सामन्यातही इशानने ७० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. हार्दिक या संघात फक्त फलंदाज म्हणूनच खेळत आहे, तो गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फलंदाज म्हणून सध्याच्या घडीला हार्दिकपेक्षा इशान चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे हा महत्वाचा बदल भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात करू शकतो, असे चिन्ह दिसत आहे. भारतीय संघात कदाचित तिसरा बदल हा भुवनेश्वर कुमारच्याबाबत होऊ शकतो. भुवनेश्वर सध्या चांगल्या फॉर्मात दिसत नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात येऊ शकते. कारण शार्दुल एक तर चांगल्या फॉर्मात आहे. त्याचबरोबर शार्दुल वेगवान गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे हार्दिक पंड्या संघात नसताना शार्दुल हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर येऊ शकतो. पण त्यासाठी त्याला फलंदाजीमध्ये बढती देणे आवश्यक असेल. त्यामुळे हे तीन बदल भारतीय संघात होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vSGkTj
No comments:
Post a Comment