Breaking

Tuesday, October 12, 2021

स्नेहा वाघचा गेम पाहून प्रेक्षक भडकले; म्हणाले, तू तर मीरापेक्षाही भयंकर स्पर्धक https://ift.tt/3mPGGFZ

मुंबई : कार्यक्रमात सध्या अनेक घडामोडी घडत असल्याने कार्यक्रमाची उत्कंठा दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या आठवड्यात अक्षय वाघमारे याचे एलिमिनेशन झाल्याने त्याला घरातून बाहेर जावे लागले होते. त्याआधी शिवलीलाने देखील तब्येतीचे कारणामुळे कार्यक्रमातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या जागी वाईल्ड कार्डद्वारे आदिदश वैद्य याने प्रवेश केला आहे. एकूणच सध्या बिग बॉसच्या घरात खूप काही गोष्टी घडत आहेत. अशातच बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आणि स्नेहा वाघ यांच्यात 'कुछ कुछ होता है' टाईप काहीतरी सुरू झाले आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात स्नेहाचा खेळ फार काही उठावदार होत नाही. त्यातच तिचे आणि जयचे जे काही वागणे आहे, त्यामुळे प्रेक्षक स्नेहावर चांगलेच भडकले आहे. सोशल मीडियावर तर तिला ट्रोल करायला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठी ३ च्या घरात स्पर्धक म्हणून स्नेहा वाघ सहभागी झाली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ती काही तरी चांगले खेळत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु कार्यक्रम सुरू होऊन तीन आठवडे झाली तरी स्नेहाने अजूनही स्वतःचे अस्तित्व तिथे दाखवून दिलेले नाही. त्यामुळे तिचे चाहते आणि प्रेक्षकही निराश झाले आहेत. त्यातच तिच्यात आणि जयमध्ये जे काही प्रेमाचे वारे वाहत आहेत ते पाहून तर सर्वचजण तिच्यावर भडकले आहेत. युझर्सनी त्यांचा राग सोशल मीडियावर कॉमेन्ट करत व्यक्त केला आहे. काय म्हणाले युझर्स बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या स्नेहाचे खेळाबद्दल काही प्लॅन्सच नाहीत. या खेळात पुढे जाण्यासाठी तिचे काही स्ट्रॅटर्जी नाही. तिचे हसणे लबाड आणि एकूणच लूक देखील वाईट असल्याच्या कॉमेन्ट युझरने केल्या आहेत. सोनाली-विशाल आणि जय-स्नेहा यांच्यात तुलना सोशल मीडियावर युझर्सने स्नेहा वाघ आणि जय दुधाणे यांच्यात जुळत असलेल्या केमेस्ट्रीची तुलना सोनाली पाटील आणि विशाल निकम यांच्याशी केली जात आहे. त्यासंदर्भात एका युझरने लिहिले आहे की, ' मला असे वाटते की स्नेहा आणि जय यांना त्यांच्यात असलेल्या केमेस्ट्रीची, फुलत चाललेले प्रेम दाखवण्याची फारच घाई झाली आहे. इतकेच नाही तर हे दोघांनाही सोनाली आणि विशालचा मत्सर वाटत आहे...' स्नेहा गेमच खेळत नाहीये स्नेहा वाघ सोशल मीडियावर ट्रोल होण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिचे न खेळणे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी धडपडत आहे. खेळात पुढे जायचे ही ईर्ष्या प्रत्येकामध्ये दिसत आहे. परंतु स्नेहा असे काहीच करताना दिसत नाही. त्यामुळे युझर्स कमालीचे नाराज झाले असून त्यामुळेही तिला ट्रोल केले जाते. एका युझरने लिहिले आहे की, ' स्नेहा वाघ घरात आहे का? गेल्या तीन आठवड्यांपासून ती घरात काय खेळत आहे?' मीरापेक्षा स्नेहा ठरतेय वाईट स्नेहा वाघवर युझर्सने आणखी एक आरोप केला आहे की, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहा खूप चांगली दिसत होती परंतु आता ती मीरापेक्षाही वाईट झाली आहे. एका युझरने कॉमेन्ट केली आहे की, ' स्नेहा वाघ माठ, मुर्ख आहे खूप. बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती चांगली खेळत होती आता ती मीरापेक्षा बावळट वाटत आहे...' स्नेहा करते जयची वकिली या कार्यक्रमामध्ये स्नेहा सतत जयची वकिली करताना दिसत असल्याबद्दलही प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्नेहा जर अशीच खेळत राहिली तर लवकरच घराच्या बाहेर जाईल. एका युझरने लिहिले आहे की, 'जयवर लाईन मारते आहे बबली...त्याची वकिली करते... स्नेहा वाघ तू लवकरच घरी जाशील...' त्याचप्रमाणे त्या दोघांमध्ये दिवसागणिक जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे स्नेहाचे खेळण्यावरील लक्ष उडाले आहे. त्यावरूनही तिच्या टीका होत आहे. स्नेहाच्या हे वागणे पाहूनही तिच्यावर टीका होत आहे. एका युझरने तर लिहिले आहे की, ' स्नेहा ही जयची पर्सनल सेक्रेटकरीच झाली आहे. कारण बिग बॉसच्या घरात ती स्पर्धक म्हणून कमी तर जयची सेक्रेटरी म्हणून वावरताना दिसत आहे. ती केवळ शो ची बाहुली म्हणून राहिली आहे...' जयला सतत पाठिंबा देते बिग बॉस मराठी ३ च्या सोमवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये जयला घराचा राखदार म्हणून टास्क करावा लागला होता. रात्रभर तो घराच्या दाराशी उभा होता. जयबरोबर दादूस आणि मीनल यांनाही हा टास्क करायचा होता. दादूसने अतिशय प्रामाणिकपणे हा टास्क खेळला. परंतु जयने मात्र फारच नखरे केले होते. त्यावरून सोशल मीडियावर त्याच्या टीका होत आहे. त्याचबरोबर स्नेहा आणि सुरेखा कुडची यांच्यावरही युझर्सने टीका केली आहे. 'स्नेहा ही जयला कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे चिकटून बसली आहे तर सुरेखा ही त्याची चमची असल्यासारखी वावरत आहे. या दोन्ही बायकांना आत्मसन्मान नाही का?' असे एका युझरने लिहिले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FIVv5S

No comments:

Post a Comment