Breaking

Tuesday, October 12, 2021

अजय देवगणची बेयर ग्रिल्ससोबत धमाल; The wild शोचा व्हिडिओ व्हायरल https://ift.tt/3v3BLVU

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आता Into The Wild with या प्रसिद्ध शोमध्ये दिसणार आहे. शोचा नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये अजय देवगण आणि एकत्रितपणे धोक्यांचा सामना करत रोमांच आणि धाडसी कृत्यांच्या प्रवासाला निघणार आहेत. हा एपिसोड 22 ऑक्टोबरला डिस्कव्हरी प्लसवर प्रसारित केला जाणार आहे. अजय देवगणने केली धमाल सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करून अजय देवगण म्हणाला की, “जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे मी हे केले आहे. बेयर ग्रिल्ससोबत हिंदी महासागरातील निर्जन बेटांना एक्स्प्लोअर केले. हा कोणताच खेळ नाहीये भावा! Into The Wild मधील कधी न विसरता येणाऱ्या आमच्या प्रवासाचे ही काही क्षणचित्रे.” डिस्कव्हरी प्लस चॅनलवर 22 ऑक्टोबर तर डिस्कव्हरी चॅनलवर 25 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांमध्ये त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये अजय आणि बेयर ग्रिल्स जंगल आणि हिंदी महासागराच्या उसळत्या लाटांवर धोक्याचा सामना करताना दिसत आहे. महासागरात शार्कच्या आसपास दोघेही पोहोताना दिसले. तसेच मालदीवच्या जंगलात अजयसोबत ब्रेयर ग्रिल्स संघर्ष करताना दिसले. हे सर्व पाहून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होणार आहे, असे अजयचे म्हणणे आहे. सप्टेंबरमध्ये हा एपिसोड मालदीवमध्ये शूट करण्यात आला होता. मालदीवमध्ये अजय देवगणचा मुलगा युग आणि त्याची टीम उपस्थित होती. अजय देवगण याच्या धमाकेदार चित्रपटांच्या ट्रेलरसारखाच हा ट्रेलर बनविण्यात आला आहे. अजय देवगण इशारा देताना सांगतो की, “हा खेळ नाही भावा.” त्यावर हा परिसर त्याचा आहे, असे ब्रेयर ग्रिल्स सांगतो. शोमध्ये दोघेही कॅनडीड चर्चाही करताना दिसतील. ते अजयचे करिअर, कुटुंब आणि आयुष्याबद्दल बोलणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FIUniH

No comments:

Post a Comment