पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) टीकास्त्र सोडले आहे. इंग्रजांना काँग्रेसने या देशातून घालवले आहे आणि आताचे भाजप सरकार तर इंग्रजांपेक्षा भयंकर आहे. आता यांना घालवण्यासाठी काम करू या, असे सांगतानाच वाद विसरा आणि पुढे चालायला शिका अशा शब्दात नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. (state congress chief criticizes bjp and modi govt comparing with british rule) पटोले काँग्रेस भवन येथे आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना पटोले म्हणाले की, काँग्रेस ही लढाऊ संघटना असून देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. मात्र ही चौकट मोडणारे सरकार सध्या देशामध्ये आहे. या सरकार आता सत्तेच्या सर्व ठिकाणांवरून घालवायचे आहे. त्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. हे लक्षात घेता आता आपसातील वाद सोडून दिले पाहिजेत. काय काय झाले याची आता चर्चा करत बसण्यात अर्थ नाही. आता आपल्याला उद्या काय करायचे आहे, यावरच लक्ष द्यावे लागणार आहे. आपण एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. क्लिक करा आणि वाचा- या बैठकांना काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पाटील यांनी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारत माहिती घेतली. मुख्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबरोबरच नाना पटोले यांनी पुणे, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यरत असललेल्या विविध आघाड्यांची बैठक घेतली. क्लिक करा आणि वाचा- या बैठकांना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष, आमदार संजय जगताप उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Bgsz2L
No comments:
Post a Comment