Breaking

Saturday, October 9, 2021

'ड्रग पार्टी प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा' https://ift.tt/3uXT0rA

नागपूर: क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी (Drugs party case) एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईसंदर्भात आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी आणि भाजपवर (BJP) आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांनीही एक गौप्यस्फोट केला आहे. ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या लोकांपैकी काहींना सोडून देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून देण्यात आले. मी त्याचे नाव घेणार नाही. मात्र तो क्लीन होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ( released a person who is close to the son of a senior says ) सोडून दिलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा माणूस फडणवीस हे नागपूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, एनसीबीने क्रूझवर कारवाई करताना अनेक लोकांना पकडले. यातील जे लोक क्लीन होते त्यांना एनसीबीने सोडून दिले. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होते, त्यांना मात्र एनसीबीने अटक केली. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. अशा गोष्टीच्या विरोधात एखादी संस्था जर काम करत असेल तर त्या यंत्रणेच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. पण या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे, असे म्हणत फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला. क्लिक करा आणि वाचा- हा गौप्यस्फोट करताना फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे ज्या लोकांना सोडण्यात आले, त्या लोकांमध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस होता. पण तो क्लीन होता, त्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे बरोबर नाही. मात्र, ते कुठल्या पक्षाचे होते की नाही हा मुद्दाच येत नाही. क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिकांवर केली टीका या वेळी पत्रकारांनी फडणवीस यांना एनसीबीचे खच्चीकरण केले जात आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्याबाबात मी याआधीही बोललेलो आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/305NJmh

No comments:

Post a Comment