Breaking

Saturday, October 9, 2021

पुण्यात पुन्हा धडकी भरवणारा पाऊस; 'त्या' जलप्रलयाची झाली आठवण! https://ift.tt/3uVGsAS

पुणे: शहरात शनिवारी सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले. अवघ्या तासा-दीड तासाच्या जोरदार पावसामुळे रात्री साडेआठपर्यंत ४९.२ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर , , येरवडा, नागपूर चाळ, विश्रांतवाडी परिसरात सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. या घटनांमुळे पुणेकरांना पुन्हा एकदा दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण पावसाची आठवण झाली. ( ) वाचा: शहरात दिवसा ऊन होते, तर दुपारनंतर हवामान ढगाळ झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास शहराच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला सुरुवात झाली. उपनगरांतील येरवडा, धानोरी, नगर रस्ता, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, सिंहगड रस्ता अशा भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. मध्यवस्तीतील परिसरातही जोराचा पाऊस झाल्याचे दिसून आले. सुमारे तीन ते चार तास पाऊस पडत असल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. शहराच्या विविध भागांत सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. लोहगाव परिसरातही मुसळधार पाऊस पडल्याने सोसायट्यांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पाण्याच्या संपर्कात आल्याने 'महावितरण'कडून परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला होता. धानोरीतील डोंगरालगत असलेल्या परिसरात डोंगरावरील पाणी वाहून आल्याने धानोरीतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. यामुळे रस्त्यावर असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात तरंगत असल्याचे चित्र होते. वाचा: वाहतूक कोंडीचा यांना फटका लोहगाव परिसरात दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका विमानतळावरील तीनशे प्रवाशांना तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला. रात्री नऊनंतर लोहगाव विमानतळावरून शासकीय विश्रामगृहाकडे निघालेले पवार अर्धातास वाहतूक कोंडीत अडकले होते. औरंगाबाद दौरा आटोपून पुण्यात आल्यानंतर पवार यांचा ताफा नवीन विमानतळ रस्त्याने पाठविण्यात आला. मात्र, पुणे- नगर महामार्गावर शास्त्री चौकात झालेल्या वाहतूक कोंडीत त्यांचा ताफा अडकला. विमानतळ, लोहगाव, धानोरी, येरवडा येथे दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने तीनशे प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. या भागात दुपारपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3anPywX

No comments:

Post a Comment