मुंबई: प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच दोघांविरुद्ध मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये लेखी तक्रारींचे अर्ज येत आहेत. त्यातच एनसीबीचा पंच साक्षीदार आणि किरण गोसावी याचा खासगी अंगरक्षक यानेही खंडणीच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलिसांकडे जबाब दिला आहे. या सर्व प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या सर्व प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ( ) वाचा: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर नवाब मलिक हे एकापाठोपाठ एक खुलासे करून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करीत आहेत. तर हे आरोप खोटे असल्याचे वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय सांगत आहेत. वानखेडे आणि मलिक आमनेसामने आले असतानाच त्यांची बाजू घेणाऱ्या आणि विरोधात असलेल्यांचेही गट तयार झाले आहेत. आरोप प्रत्यारोपांचे हे सत्र सुरू झाल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांकडून मलिक आणि वानखेडे यांच्या विरोधात लेखी तक्रारी येऊ लागल्या आहेत. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत अर्धा डझनपेक्षा अधिक तक्रारी आल्या असून यामध्ये अद्याप कुठेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वाचा: प्रभाकर साईल यानेही वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप करीत मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. पोलिसांनी संरक्षण पुरवितानाच त्याच्याकडून वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणी जबाब नोंदवून घेतला आहे. या सर्व प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हा अधिकारी या सर्व तक्रारींची शहानिशा करेल आणि त्यावरून एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. असे आहे तपास पथक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहायक निरीक्षक श्रीकांत कारकर आणि उपनिरीक्षक प्रकाश गवळी यांचे पथक तक्रारींची चौकशी करणार आहे. अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे पर्यवेक्षक अधिकारी असतील तर पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत हे सहायक पर्यवेक्षक अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था, मुंबई) विश्वास पाटील यांनी हा आदेश काढला आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mi7hg3
No comments:
Post a Comment