अबुधाबी: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला धक्का दिला. आयपीएलच्या १४व्या हंगामातील ५२व्या लढतीत हैदराबादने ४ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे गुणतक्त्यात तळाला असलेल्या हैदराबाद संघाला काहीच फरक पडणार नाही. पण पराभवामुळे आरसीबीला मोठा फटका बसू शकतो. आरसीबीने गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी गमावली. कारण दुसऱ्या क्रमांकावरील संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी दोन वेळा मिळते. वाचा- विजयासाठी १४२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहली फक्त ५ धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ डॅनियल क्रिश्चन १ धाव करून माघारी परतला. एस भारत देखील फार धाव करू शकला नाही. त्यामुळे आरसीबीची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी संघाला शतकाच्या जवळ पोहोचवले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला मॅक्सवेल ४० धावांवर धावबाद झाला. त्याने २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या. मॅक्सवेलनंतर देवदत्तला राशिद खानने ४१ धावांवर बाद केले. वाचा- देवदत्तच्या विकेटनंतर हैदराबादने सामन्यावर पकड मजूत केली. सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. आरसीबीला विजयासाठी ६ चेंडूत १३ धावांची गरज होती. कर्णधार केनने अनुभवी भुवनेश्वरच्या हातात चेंडू दिला. चार चेंडूत १२ धावांची गरज असताना एबीने षटकार मारला. भुवीच्या पाचव्या चेंडूवर एबीने धाव काढली नाही. अखेरच्या चेंडूवर एबीने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला नाही. वाचा- विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सुरूवात फार चांगली झाली नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विलियमसन आणि जेसन राय यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. हर्षल पटेलने विलियमसनची विकेट घेत ही जोडी फोडली. त्यानंतर प्रियम गर्ग १५ धावांवर माघारी परतला. तर डॅनियल ख्रिश्चनने रायचा अफलातून कॅच घेतला. राने ३८ चेंडूत ४४ धावा केल्या. राय पाठोपाठ अब्दुल समद १ धाव करून माघारी परतला. तर वृद्धिमान सहाला १० धावांवर हर्षलने बाद केले. हैदराबादने २० षटकात ७ बाद १४१ धावा केल्या.आरसीबीकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. या सामन्यात हर्षलने आयपीएलच्या एका हंगामात भारतीय गोलंदाजाद्वारे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहचा २७ विकेटचा विक्रम मागे टाकला. हर्षलने आतापर्यंत २९ विकेट घेतल्या आहेत. वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WLHdQo
No comments:
Post a Comment