Breaking

Wednesday, November 24, 2021

पेग्विन देखभालीसाठी BMC तीन वर्षांत करणार १५ कोटींचा खर्च https://ift.tt/3ph3H6j

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणीसंग्रहालयामधील (राणी बाग) पेंग्विन देखभालीवरील खर्चाचा मुद्दा नव्याने चर्चेस आला आहे. पेंग्विन देखभालीसाठी पालिका पुढील तीन वर्षांमध्ये १५ कोटी २४ लाख रुपये खर्च करणार आहे. त्या निविदा प्रक्रियेत सध्याच्या कंत्राटदाराचीच एकमेव निविदा दाखल झाली आहे. त्यावर बुधवारच्या पालिकेच्या स्थायी समितीत विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय होऊ शकलेला नाही. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिका तीन वर्षात १५ कोटी २४ लाख रु. खर्च केला जाणार आहे. त्यामुळे, एका दिवसामागे साधारण १ लाख ४१ हजार रु. खर्च होणार आहे. पालिकेने त्यासाठी मागविलेल्या निविदा प्रक्रियेत सध्याच्याच कंत्राटदारच सहभागी झाला होता. त्यापूर्वी, पहिल्या वेळेस दोन कंत्राटदार सहभागी झाले होते. त्या प्रक्रियेत, एकाच कंत्राटदाराची निविदा प्रतिसादात्मक ठरल्याने ती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. पालिकेने पेंग्विन देखभालीच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी निविदा मागवल्या होत्या. त्यातील खर्चावरून वाद निर्माण झाल्याने पालिकेने निविदा प्रक्रियेत सुधारणा करताना त्यामधील काही कामे कमी केली होती. त्यानंतर पालिकेने दोनदा मागविलेल्या निविदांमध्ये केवळ एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिला. तेव्हा पालिकेने निविदेत सहभागी झालेल्या कंपनीस कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या राणीच्या बागेत नऊ पेंग्विन असून तीन वर्षांच्या काळात नव्या पेंग्विनचा जन्म झाल्यास कंत्राटदाराकडून त्याच्या देखभालीसाठी कोणताही ज्यादा खर्च मागितला जाणार नसल्याचे पालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. इतर संपूर्ण कामात जीवरक्षक प्रणाली, पशुवैद्यकीय सेवा, खाद्य, विद्युत यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणाची कामे आदींचा समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZkOfNk

No comments:

Post a Comment