Breaking

Tuesday, November 30, 2021

Breaking: मुंबईकरांनो सावधान! IMDने जारी केला अलर्ट; दिला 'हा' इशारा https://ift.tt/3rm5dq6

नवी दिल्ली: पावसाळा संपला असला तरी महाराष्ट्रावरील पावसाचं संकट संपलेलं नसून हवामान विभागाने एक अलर्ट जारी करत मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुंबईसोबतच आणि या जिल्ह्यांनाही सतर्क करण्यात आले असून आणि आंध्र प्रदेश या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ( ) वाचा: हवामान विभागाने व गुजरातला सतर्क केलं आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून जवळ अरबी समुद्रात पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्याचा परिणाम म्हणून अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकण भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून त्यात , पालघर आणि ठाणे या पट्ट्यात सर्वाधिक पाऊस कोसळू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. गुरुवारी (२ डिसेंबर ) गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळेल, असेही हवामान विभागाने सांगितले. वाचा: अंदमानच्या समुद्रात पुढील १२ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यातून बंगालच्या खाडीत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ त्यापुढील एक दोन दिवसांत आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या किनारी धडकू शकतं, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाचे... - ओडिशाच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागालाही पावसाचा तडाखा बसेल. - उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अनेक भागांत ५ आणि ६ डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळेल तर काही भागांत शिडकावा होईल. - मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळेल तर गुरुवारीही उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत जोरदार पाऊस कोसळू शकतो. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xGQgjv

No comments:

Post a Comment