म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात हनी ट्रॅपचे () नवनवीन गुन्हे उघडकीस येत आहेत. कागल तालुक्यातील एका व्यवसायिकास हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखो रूपये उकळल्याची तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपीने हनी ट्रॅपसाठी स्वत:च्या पत्नीचाच वापर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर व्यापाऱ्यास मुंबईतील टोळीने हनी ट्रॅपमध्ये अडकवून साडे तीन कोटीची लुट केली. त्या पाठोपाठ एका कापड व्यापाऱ्यास त्यामध्ये अडकवले. याप्रकरणी सराईत टोळीला पोलिसांनी अटक केली. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. यानुसार आतापर्यंत हनी ट्रॅपला बळी पडलेले काहीजण पुढे येत असून ते पोलिसात फिर्याद देत आहेत. कागल येथील एका व्यवसायिक या जाळ्यात अडकवून त्याला लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी सराईत गुन्हेगार विजय कलघटगीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात उघडकीस आलेली ही चौथी घटना आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यातील घटनेत महिलेने या व्यवसायिकाची ओळख करून त्याच्याशी चॅटिंग केले. सलगी वाढविली. मोबाइलवर चित्रीकरण करत त्यास बदनामी करण्याची भीती दाखवत लाखो रूपये उकळले. पण सततच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने तक्रार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CWnlZN
No comments:
Post a Comment