दुबई : रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या स्थानावर पाठवण्यात आले होते. पण हीच गोष्ट आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही होणार का, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. रोहित अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कितव्या स्थानावर येणार, पाहा...रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीला पाठवण्यात आले होते. पण त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहितला तिसऱ्या स्थानावर पाठवून त्याच्याबद्दल अविश्वास दाखवण्यात आला होता. त्यामुळे आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित नेमका कोणत्या स्थानावर येणार, याची उत्सुकता सर्वांना असेल. पण रोहित अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीलाच येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहितला तिसऱ्या स्थानावर पाठवल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. चाहत्यांबरोबरच टीकाकारांनी यावेळी कर्णधार विराट कोहली आणि भारताच्या संघ व्यवस्थापनाला लक्ष्य केले होते. त्यामुळे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना याबाबत पत्रकार परिषदेमध्ये याबाबत खुलासा करावा लागला आणि रोहितही या निर्णयात सहभागी होता हे सर्वांना सांगावे लागले. त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तर भारतीय संघाला चांगलेच झोडपले होते. त्यामुळे फक्त या एका निर्णयामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला बरेच काही सहन करावे लागले आहे. त्यामुळे रोहितला पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानावर खेळण्याची चूक भारतीय संघ करणार नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. न्यूझीलंडविरुद्ध इशान किशनला सलामीला आणायचे होते तर लोकेश राहुलला तिसऱ्या स्थानावर पाठवले असले तर एखादवेळेस चालले असते. पण रोहितसारख्या अनुभवी सलामीवीराची जागा नवख्या खेळाडूला देण्याची चुक भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केली, पण यापुढे त्यांच्याकडून अशी चुक घडणार नसल्याचेच स्पष्ट दिसत आहे. रोहित शर्मा गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे, पण रोहितसारखे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत फॉर्मात येऊ शकतात. त्यामुळे रोहितसाठी अफगाणिस्तानचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यावर रोहितवर टीका व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे रोहितसाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल. रोहित सलामीला येऊन कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CIraTo
No comments:
Post a Comment