Breaking

Tuesday, November 2, 2021

दिवाळी ऑफर स्वीकारताना सावधान! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या नावाचा वापर करून मोठी फसवणूक https://ift.tt/3CFYFFO

मुंबई : दिवाळीनिमित्त ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या अनेक कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन बाजारात उतरल्या आहेत. याच कंपन्यांच्या नावांचा वापर करून सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या सवलती, लकी ड्रॉ, लॉटरी अशा योजनांच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली असून तशा तक्रारी देखील वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबई सायबर पोलिसांनी सर्व नागरिकांना सावध केलं असून (Amazon flipkart 2021) स्वीकारताना जरा जपून व्यवहार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या सणाला घरगुती उत्पादने, कपडे तसंच इतर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. दोन वर्ष करोनामध्ये गेल्यामुळे यावर्षी अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत. एकावर एक मोफत, किमतीत ३० ते ४० टक्के सूट, गिफ्ट व्हाउचर, लकी ड्रॉ अशा योजनांच्या जाहिराती सगळीकडे झळकत आहेत. आकर्षक जाहिराती असलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांकडे ग्राहकांचा कल पाहून या कंपन्यांच्या नावाने फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सवलत मिळवण्यासाठी ग्राहकाच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा तसंच बँक खात्याचा तपशील घेऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. या घटना वाढल्याने सायबर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना सावध केलं आहे. कोणत्याही दिवाळी ऑफर्स स्वीकारताना प्रथम शहानिशा करावी तसंच कोणतीही वैयक्तिक माहिती अथवा बँकेचा तपशील अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असंही सायबर पोलिसांनी कळवलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31j7k2Z

No comments:

Post a Comment