Breaking

Thursday, November 18, 2021

ओवेसी यांची औरंगाबादेतून मोठी घोषणा; 'या थ्री इन वन सरकारला...' https://ift.tt/3CtXXdY

औरंगाबाद: ' आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मराठा आणि जाहीर केले. मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्यानंतर मराठा समाजाला देण्यात आले. मात्र कोर्टाने मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देण्याबाबत अनुकूलता दर्शविली असतानाही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी विधीमंडळात ठराव घेण्यात आला नाही. हा मुस्लिम समाजासोबत अन्याय आहे. थ्री इन वन सरकारला मुस्लिम आरक्षणाचा विसर पडल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. म्हणूनच या अन्यायाविरोधात आवाज उठवत मुस्लिम आरक्षण मिळवण्यासाठी एमआयएम राज्यभरात आंदोलन उभे करणार आहे, अशी घोषणा एमआयएमचे खासदार यांनी आज येथे केली. ( ) वाचा: अमरावती आणि मालेगाव येथे झालेल्या दंगलींचा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निषेध केला. या दंगली शांत समाजासाठी घातक आहेत. राज्यात शांतता राहावी ही राज्याच्या विकासाला आवश्यक बाब आहे. अशा पद्धतीने कोणी दंगल घडवून अशांतता माजवत असेल तर निश्चितच उच्चस्तरिय समितीच्या माध्यमातून चौकशी करून अशांविरोधात कारवाई करण्याची गरज असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. राज्यात काही संघटनांकडे भाजपाची बी टीम म्हणून पाहिले जात असल्याचे पत्रकार म्हणाले. त्यावर खासदार ओवेसी यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. बी टीमचा कॉपीराइट माझ्याकडे आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ओवेसी म्हणताच हंशा पिकला. आता तर आम्ही ए टीम झाल्याचेही ते पुढे म्हणाले. वाचा: मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट या विषयावर दुआ फाउंडेशन आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस यांच्यावतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ओवेसी औरंगाबाद येथे आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. महाराष्ट्रातील तसेच अन्य भागातील मुस्लिम समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हा चिंतेचा विषय आहे. विविध राज्यात मुस्लिम समाजातील काही जातींना आरक्षण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातही आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे. मुस्लिम समाज हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. यामुळेच हा समाज मागे पडत असल्याचे विश्लेषण अनेक तज्ज्ञांनी चर्चासत्रात मांडले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Hx7GDZ

No comments:

Post a Comment