नवी दिल्ली: चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक एन्क्लेव्ह (गाव) बांधले आहे. यामध्ये किमान ६० इमारती आहेत, उपग्रह फोटोतून ही चीनची ही नवी कुरापत समोर आली आहे. हे एन्क्लेव्ह २०१९ मध्ये अस्तित्वात नव्हते. पण एक वर्षानंतर ते दिसले. नवीन एन्क्लेव्ह अरुणाचल प्रदेशच्या क्षेत्रापासून ९३ किमी दूर पूर्वेला स्थित आहे. काही दिवसांपूर्वी पेंटागॉनच्या अहवालातही याची पुष्टी झाली होती. भारताने पेंटागॉनच्या अहवालानंतर चीन उद्देशून तीव्र प्रतिक्रिया दिली होती. 'ज्या भागावर चीनने बेकायदेशीरपण कब्जा केला आहेत तिथे गेल्या अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागात चीनची बांधकामे सुरू आहेत. भारताने आपल्या भूभागावर असा बेकायदेशीर ताबा कधीच मान्य केलेला नाही आणि चीनचे तर्कहीन दावे ते मान्य करत नाहीत...', असे भारताने म्हटले. हा दुसरा एन्क्लेव्ह भारतापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा यांच्या दरम्यान असलेल्या भागात आहे. हा आपला भूभाग असल्याचा दावा भारताने नेहमीच केला आहे. या एन्क्लेव्हमध्ये लोकं आहेत की नाहीत, हे फोटोंवरून स्पष्ट होत नाहीए. 'संबंधित क्षेत्र एलएसीच्या उत्तरेकडील चीनच्या हद्दीत आहे...', असे भारतीय लष्कराने सांगितले. एन्क्लेव्ह आणि आंतरराष्ट्रीय सीमा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ती भारतीय हद्दीत आहे, जी चीनने बेकायदेशीरपणे बळकावली आहे. ज्या क्षेत्राचा उल्लेख केला जात आहे ते LAC च्या उत्तरेला आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले. पण भारतीय भूमीवर चीनच्या नवीन एन्क्लेव्हचे बांधकाम नाकारण्यातही आलेले नाही. पेंटागॉनच्या अहवालावर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात दिलेल्या निवेदनात केवळ कबुलीच दिली नाही, तर चीनने नेमक्या याच बांधकामाद्वारे भारतीय भूभाग जोडण्याचा प्रयत्न केला आहे, हे विशेष.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YYKX23
No comments:
Post a Comment