अकोला : अकोला जिल्ह्यातील पातुरच्या धामणदरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे. तिथे असलेल्या स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र या घटनेनंतर पातूर शहरात या अल्पवयीन मुलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. पातुर शहरातील विश्रामगृहाच्या मागे असलेल्या या परिसरात धामणदरी हा मोठा तलाव आहे. या तलावात आता सध्याच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचं सांगितलं जातं.या तलावात पोहोण्यासाठी गावातील पाच मित्र सोबत काल दुपारच्या सुमारास गेली होती. ही पाचही मुले अल्पवयीन असून त्या पाचपैकी दोन मुले पोहोण्यासाठी पाण्यात उतरली असता त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती दोन मुलं पाण्यात बुडाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण पातूर शहर हादरून गेलं आहे. वाचाः मृत पावलेल्या मुलांची नावे, शेख दानिश अस्लम (वय १५ वर्षे), शेख समिर रईस अशी असून दोघेही साळणीपूरा पातूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे मृतदेह स्थानिक मच्छीमार देविदास श्रीनाथ यांच्या मदतीने तलावाबाहेर काढण्यात पातूर प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. पाच पैकी वाचलेल्या तीन मुलांनी प्रशासनाला तिथे घडलेली सर्व माहिती दिली. वाचाः घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हरीश गवळी ताफ्यासह तथा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन सामग्री सह नायब तहसिलदार सय्यद ऐहसानोद्दिन, तलाठी पठाण, पोलीस विभागाचे भवाने तथा मेजर पवार घटना स्थळी होते. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. वाचाः
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FzfCTh
No comments:
Post a Comment