Breaking

Friday, November 19, 2021

... तो आला आणि रोहित शर्मासमोर नतमस्तक झाला, दुसऱ्या सामन्यातील हा फोटो झाला भन्नाट व्हायरल https://ift.tt/3DBG2mX

रांची : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय साकारला. या विजयात रोहित शर्माने फक्त अर्धशतक झळकावले नाही तर त्याने इतिहासही रचला. पण त्यापेक्षा जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात एका वेगळ्याच गोष्टीची आहे आणि की आहे रोहित शर्मापुढे नतमस्तक झालेल्या त्या व्यक्तीची... नेमकं झालं तरी काय, पाहा...रोहित शर्मा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. कर्णधार म्हणून तर त्याने दोन सामन्यांमध्येच मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर दोन सामन्यांमध्ये त्याची सरासरी ५०पेक्षा जास्त आहे. पण रोहित आताच फॉर्मात आले असं नाही तर त्याने आतापर्यंत बरेच मैलाचे दगड पादाक्रांत केले आहेत आणि त्यामुळेच चाहत्यांच्या गळ्यातील रोहित ताइत बनला आहे. अशीच एक गोष्ट न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही पाहायला मिळाली. भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा एक चाहता सर्व सुरक्षाकवच भेदत मैदानात घुसला आणि तो रोहितकडे धावत गेला. रोहितपुढे गेल्यावर हा चाहता त्याच्यापुढे नतमस्तक झाला. हा फोटो सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या फोटोची जोरदार चर्चाही सुरु आहे. रोहितने या सामन्यात रचला इतिहास...दुसऱ्या ट्वेन्टी०-२० सामन्यात रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने यावेळी ५५ धावांची दमदार खेळी साकारली. ही खेळी साकारताना रोहितने यावेळी पाच चौकार लगावले आणि इतिहास रचला. रोहितने जेव्हा पहिलाच षटकार लगावला होता तेव्हा ४५० षटकारांचा टप्पा त्याने पूर्ण केला होता. त्यानंतर त्याने अजून चार षटकार लगावले आणि नेत्रदीपक फटकेबाजीचा नजराणा पेश केला. याआधी ४५० षटकारांचा टप्पा पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांनी पार केला आहे. आजपर्यंत एकाही भारतीय खेळाडूंना ४५० षटकारांचा टप्पा पार केला नाही. त्यामुळे रोहितने एक षटकार मारताच तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. या सामन्यात रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या उर्रवरीत दोन टी-२० सामन्यात आठ षटकार मारले तर टी-२० मध्ये त्याचे १५० षटकार पूर्ण झाले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरले. याआधी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल याने टी-२० मध्ये १५० षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30IpE5y

No comments:

Post a Comment